किरीट सोमय्या यांना बंगल्याबाहेर चहाची टपरी टाकून द्या- अनन्या नाईक

किरीट सोमय्या यांना बंगल्याबाहेर चहाची टपरी टाकून द्या- अनन्या नाईक

| Edited By: | Updated on: Feb 18, 2022 | 5:43 PM

किरीट सोमय्या यांना बंगल्याबाहेर चहाची टपरी टाकून द्या, असं अनन्या नाईक म्हणाल्या आहेत.

अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणावरून पुन्हा एकदा अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. अर्णब गोस्वामीला अटक झाल्यानंतर हाच सर्वात पुढे होता, तोच सगळीकडे धावत होता. रश्मीताईंना माझी विनंती आहे की, तो आताही जमीनीच्या प्रकरणात एवढा इंटरेस्ट घेत आहे, त्याला एखाद्या माळ्याचे काम तरी मिळून द्या. माझ्या वडिलांनी लावलेली झाडे आहेत, ती आता सुकत आहेत.  किरीट सोमय्या यांना माळ्याचे काम दिले तर ते त्या झाडांची तरी देखरेख करतील. माळ्याची नाही जमली तर कमीत कमी त्यांना वॉचमनची तरी नोकरी द्यावी असा टोला अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी सोमय्यांना लगावला आहे. तसंच किरीट सोमय्या यांना बंगल्याबाहेर चहाची टपरी टाकून द्या, असं अनन्या नाईक म्हणाल्या आहेत.