Anil Deshmukh यांचा मतदानाचा अर्ज ईडी कोर्टाने फेटाळला

| Updated on: Jun 09, 2022 | 7:54 PM

उच्च न्यायालयात त्यावर आज सुनावणी होण्याची शक्यता नाही. आणि जर सुनावणी झाली तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता येणार का कडे सर्वांचे लक्ष लागले.

Follow us on

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीची (Rajya Sabha Election 2022) रणधुमाळी सुरू सत्र न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला धक्का देणारा निर्णय दिला आहे. सत्र न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) आणि अनिल देशमुख (anil deshmukh) यांचा विनंती अर्ज फेटाळला आहे. ज्यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणुकी 10 जून रोजी होणार आहे. त्यातच राष्ट्रवादीचे दोन हक्काचे मतदान कुजणार असून अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदान करता यावं म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र उच्च न्यायालयात त्यावर आज सुनावणी होण्याची शक्यता नाही. आणि जर सुनावणी झाली तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता येणार का कडे सर्वांचे लक्ष लागले.