NCP Ajit Pawar : अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण? थेट माजी मंत्र्याचा सवाल करत गंभीर आरोप

NCP Ajit Pawar : अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण? थेट माजी मंत्र्याचा सवाल करत गंभीर आरोप

| Updated on: Dec 08, 2025 | 5:41 PM

अनिल पाटील यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया कुणाच्यातरी सांगण्यावरून काम करत असून, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याची सुपारी दिली असल्याचा दावा पाटील यांनी केला

नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान, माजी मंत्री अनिल पाटील यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पाटील यांनी दमानिया यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची सातत्याने करत असलेल्या मागणीवर तीव्र आक्षेप घेतला. पार्थ पवार आणि अमिडिया कंपनी प्रकरणावरून दमानिया अजित पवारांवर ‘प्रॉफिट ऑफ इंटरेस्ट’चा आरोप करत राजीनामा मागत आहेत. यावर बोलताना अनिल पाटील यांनी अंजली दमानिया यांच्या हेतूंवर संशय व्यक्त केला. “अंजली दमानिया आमच्या नेत्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार कोण आहेत?” असा सवाल पाटील यांनी विचारला. दमानिया ज्यांच्या विरोधात बोलतात, त्यांची त्यांना सुपारी दिली जाते, असा गंभीर आरोप त्यांनी केला. पाटील यांच्या मते, दमानिया केवळ अजित पवारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचे काम करत आहेत. त्यांनी समाजकार्याकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही पाटील यांनी दिला.

Published on: Dec 08, 2025 05:41 PM