Anjali Damania Video : ‘…तरच संतोष देशमुखांना न्याय मिळेल’, दमानियांनी पुन्हा मागितला धनंजय मुंडेंचा राजीनामा

Anjali Damania Video : ‘…तरच संतोष देशमुखांना न्याय मिळेल’, दमानियांनी पुन्हा मागितला धनंजय मुंडेंचा राजीनामा

| Updated on: Feb 19, 2025 | 5:44 PM

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. इतकंच नाहीतर अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. इतकंच नाहीतर अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘अनेक लोकांना असं वाटतंय की मी जे जे मांडत आहे, मग ते ऑफिस ऑफ प्रॉफिट असो, कृषी घोटाळा असो हे सर्व मांडण्याची गरज काय? धनंजय मुंडे यांचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध काय? संतोष देशमुखांची जी हत्या झाली, त्याबद्दल सर्वांना जो आक्रोश आहे, आणि या प्रकरणात आतापर्यंत आपल्याला नीट कारवाई होताना दिसत नाहीये. अपेक्षित कारवाई होताना दिसत नाहीये, म्हणूनच मला वाटतंय आहे की, जोपर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळातून बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत या हत्येच्या शोधाला नीट दिशा मिळणार नाही’, असं स्पष्टपणे अंजली दमानिया म्हणाल्यात.  इतकंच नाही तर मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचे सांगून मुंडेंनी भ्रष्टाचार केला. आयएफएफसीओमध्ये घोटाळा झाला, असा गंभीर आरोप देखील दमानियांनी केला आहे. बघा काय म्हणाल्या अंजली दमानिया?

Published on: Feb 19, 2025 05:44 PM