Anjali Damania Video : ‘अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर…’, दादांच्या भेटीनंतर दमानियांचं चॅलेंज

Anjali Damania Video : ‘अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर…’, दादांच्या भेटीनंतर दमानियांचं चॅलेंज

| Updated on: Jan 28, 2025 | 1:13 PM

अजित पवारांना भेटल्यानंतर अंजली दमानिया यांनी बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी तुरूंगात असलेल्या वाल्मिक कराडविरोधात अनेक पुरावे दिलेत. आता काय कारवाई होणार?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवारांना भेटल्यानंतर अंजली दमानिया यांनी बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी तुरूंगात असलेल्या वाल्मिक कराडविरोधात अनेक पुरावे दिलेत. इतकंच नाहीतर यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही अंजली दमानिया यांनी अजित पवारांकडे केली. दरम्यान, ही भेट झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेईन, असं आश्वासन अजित पवार यांनी अंजली दमानिया यांना दिलं. वाल्मिक कराड आणि टोळीने बीडमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत पसरवली आहे. त्याचे सगळे फोटो, व्हिडीओ, रील्स अजित पवारांना दिल्याची माहिती अंजली दमानिया यांनी माध्यमांसमोर दिली. तर हे सर्व पुरावे अजित पवार यांनी शांतपणे पाहिलेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार भेटणार असल्याचेही सांगितले. तर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही तर निवडणूक आयोगात जाणार असल्याचे म्हणत दमानिया यांनी आव्हान दिलंय. तर आयोगाकडून दखल घेतल्यानंतर मुंडेंची आमदारकी जाऊ शकते असंही दमानिया म्हणाल्यात.

Published on: Jan 28, 2025 01:13 PM