NCP : अजितदादा मोठेपणा दाखवणार का? सूरज चव्हाणांचा राजीनामा, आता कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात? तटकरेंचें संकेत काय?
विजय घाडगे यांच्यावर झालेल्या मारहाणी नंतर आता सुरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे. पक्षाच्या मुल्यांच्या विरोधात वर्तन खपवून घेणार नाही त्यामुळे कठोर निर्णय घेतला असा ट्वीट अजित पवार यांनी केले तर कालच्या घटनेचा आम्ही निषेध केला आहे आणि कारवाई सुद्धा झाली असा सुनील तटकरे यांनी म्हटलेल आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सभागृहामधला रमी खेळतानाचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्वीट केला होता आणि त्यानंतर तिथे टीकेची झोड उठली होती.
विजय घाडगेंवरील मारहाणी नंतर सुरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्यात आलाय. पक्षाच्या मुल्यांच्या विरोधात वर्तन खपवून घेणार नाही म्हणून कठोर निर्णय घेतला, असे अजित पवार यांनी ट्वीट केले.तर कृषीमंत्र्यांकडून घडलेली घटना चुकीची वरिष्ठ नेते कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत योग्य निर्णय घेतील, असे सूचक वक्तव्य सुनील तटकरे यांनी केले त्यामुळे कोकाटे यांचा मंत्रीपद धोक्यात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो, असं निवेदन मारहाणीच्या घटनेनंतर अजित पवार यांनी जारी केलं. दरम्यान, मोठ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्या माशाचा बळी दिला अजित दादा कोकाटे यांचा राजीनामा घेण्याचा मोठेपणा दाखवणार का असा सवाल सुरज चव्हाण यांच्या राजीनाम्यावरून रोहिणी खडसे यांनी केला.
दुसरीकडे सूरज चव्हाणांसह आज सकाळी 11 जणांवर आठ अतिशय गंभीर गुन्हे दाखल झालेले असताना आतापर्यंत त्यांना अटक झालेली नाही तर पोलिसांनी ती अटक का केली नाही? अजित पवारांनी फक्त त्यांना राजीनामा द्यायला सांगितला त्यांना पक्षातून काढून टाकण्याचे आदेश अजित पवार यांनी का दिले नाही? त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी दमानियांनी केली.
