Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीवाल ?
लोकांची सेवा करण्यासाठी राजकारण हे आमच्यासाठी केवळ एक माध्यम आहे. तेच काम इतकी वर्ष केल, यापुढेही करत राहू, अशी प्रतिक्रिया आपचे प्रमुख, अरविंद केजरीवाल यांनी दिली.
लोकांनी मोठ्या आशेने त्यांना ( भाजप) बहुमत दिलं आहे, ते या सर्व आशा, अपेक्षा पूर्ण करोत. आम्ही गेल्या 10 वर्षांत बरंच काम केलं. शिक्षण क्षेत्र, आरोग्य, पाणी, वीज यावर काम करून आम्ही लोकांना आराम मिळवून देण्याचा प्रयत्न केला. दिल्लीचे इन्फ्रास्ट्रक्चरही आम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला. आता आम्ही जनतेने दिलेला निर्णय मान्य करतो. आम्ही एक सक्षम विरोधा पक्ष म्हणून उभे राहू, तसेच समाजसेवा, जनतेच्या सुखदु:खात सहाभागी होई, वैयक्तिकक रित्या ज्याला ज्या गोष्टीची गरज असेल ती पुरवू. आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलेलो नाही. लोकांची सेवा करण्यासाठी राजकारण हे आमच्यासाठी केवळ एक माध्यम आहे. तेच काम इतकी वर्ष केल, यापुढेही करत राहू, दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आपचे प्रमुख, अरविंद केजरीवाल यांनी अशी प्रतिक्रिया दिली. जनतेने दिलेला निर्णय आम्हाला मान्य असल्याचे त्यांनी नमूद केलं.
