Owaisi on Rane : मराठीत अजानच्या मुद्द्यावर औवेसींचं राणेंना प्रत्युत्तर, आधी तबलिगी जमातच्या परिषदेचे स्वागत अन् आता…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या येत्या १८ जुलै रोजी आयोजित मीरा रोडच्या दौऱ्यावरून नितेश राणेंनी हे आव्हान केलं आहे. सगळ्या मदरशांमध्ये ऊर्दू भाषा बंद करून टाका आणि तिथे मराठी शिकवा, मराठी सक्ती करा. राणेंच्या मागणीवर ओवैसींचं उत्तर
भाजप मंत्री नितेश राणे यांनी मदरशांमध्ये उर्दूऐवजी मराठी शिकवण्याची मागणी केली होती. त्यावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर अजान देखील फक्त मराठीतच दिली पाहिजे असही राणे म्हणाले होते. दरम्यान, राणेंच्या या विधानावर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार टीका केली आहे आणि धर्म आणि भाषेच्या नावाखाली द्वेष पसरवल्याचा आरोप केला आहे. नितेश राणेंच्या वक्तव्यावर बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी राणेंवर ढोंगीपणाचा आरोप केलाय. माध्यमांशी बोलताना ओवैसी म्हणाले, ‘जर तुम्ही नितेशे राणेंचे जुने ट्विट पाहिले तर तुम्हाला समजेल की ते तबलिगी जमातच्या इज्तेमाचे स्वागत करायचे. अभिनंदन करायचे आणि आता त्यांनाच मराठीत अजान हवी आहे.’
राणेंचं वक्तव्य काय?
एवढंच जर प्रेम असेल तर उद्याचं अजान मराठी भाषेत सुरू करा‘ अजान मराठी भाषेत सुरू करण्यासह पुढे राणे असेही म्हणाले की, सगळ्या मदरशांमध्ये ऊर्दू भाषा बंद करून टाका आणि तिथे मराठी शिकवा, मराठी सक्ती करा. तेव्हा आम्हाला कळेल की तुम्ही किती महाराष्ट्रावर आणि मराठीवर प्रेम करणारे आहात?
