Asha Bhosle : ठाकरे बंधू एकत्र येणार? सवाल करताच आशा भोसले थेट म्हणाल्या, मला फक्त आशिष शेलार…
हिंदी सक्तीविरोधात काल राज ठाकरे यांनी 5 जुलैला मोर्चाची घोषणा केली तर 7 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीच्या एल्गाराची घोषणा केली. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी ही तिसरी भाषा सक्तीची करण्याविरोधात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे दोन्ही पक्ष आक्रमक झाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून हिंदी सक्तीविरोधात मोर्चे काढण्यात येणार आहे. येत्या 5 जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या या मोर्चात उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसण्याची शक्यता आहे. अशातच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला राजकारणात आशिष शेलार माहित आहे. बाकी मला कोणतेही लोकं माहिती नाही’, असं वक्तव्य आशा भोसले यांनी केलं. इतकंच नाहीतर पुढे आशा भोसले असंही म्हणाल्या की, माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही. मला राजकारण नकोय, असं मत आशा भोसले यांनी व्यक्त केलं.
Published on: Jun 27, 2025 12:43 PM
