VIDEO : Ashish Shelar | करण जोहरच्या पार्टीत कोणी मंत्री होता का? शेलारांचा बीएमसीला सवाल
बॉलिवूड निर्माता करण जोहरच्या घरी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत आलिया भट्टही सहभागी झाली होती. या पार्टीतील सहभागी झालेल्या 4 बॉलिवूड अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. आता यानंतर यावर आशिष शेलार यांनी म्हटंले आहे की, करण जोहरच्या पार्टीत कोणी मंत्री होता का? हा सवालच शेलार यांनी थेट बीएमसीला विचारला आहे.
बॉलिवूड निर्माता करण जोहरच्या घरी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत आलिया भट्टही सहभागी झाली होती. या पार्टीतील सहभागी झालेल्या 4 बॉलिवूड अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. आता यानंतर यावर आशिष शेलार यांनी म्हटंले आहे की, करण जोहरच्या पार्टीत कोणी मंत्री होता का? हा सवालच शेलार यांनी थेट बीएमसीला विचारला आहे. कभी खुशी कभी गम चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने करण जोहरने घरी एका छोट्याशा पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये आलिया भट्ट, करीना कपूर, अमृता अरोरा, महिप कपूर, सीमा खान यांच्यासह अन्य सेलिब्रेटी सहभागी झाले होते. पार्टीनंतर करीना कपूर, सीमा खान, अमृता अरोरा, महिप कपूर या अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या.
