Special Report | भाजप-राष्ट्रवादीचीच सत्ता येणार होती!-TV9

| Updated on: Apr 28, 2022 | 10:44 PM

2017 मध्येच राष्ट्रवादीसोबत जाण्याची..अर्थात राष्ट्रवादीला सत्तेत घेण्याची ऑफर होती, असा गौप्यस्फोट भाजपच्या आशिष शेलारांनी केलाय. शिवसेनेला बाहेर करण्याची राष्ट्रवादीची मागणी होती.पण शिवसेनेला सोडण्यास आम्ही तयार नव्हतो. नाही तर राष्ट्रवादीसोबत 2017 मध्येच सत्ता स्थापन झाली असती, असा दावा शेलारांनी केला.

Special Report | भाजप-राष्ट्रवादीचीच सत्ता येणार होती!-TV9
Follow us on

2017 मध्येच राष्ट्रवादीसोबत जाण्याची..अर्थात राष्ट्रवादीला सत्तेत घेण्याची ऑफर होती, असा गौप्यस्फोट भाजपच्या आशिष शेलारांनी केलाय. शिवसेनेला बाहेर करण्याची राष्ट्रवादीची मागणी होती.पण शिवसेनेला सोडण्यास आम्ही तयार नव्हतो. नाही तर राष्ट्रवादीसोबत 2017 मध्येच सत्ता स्थापन झाली असती, असा दावा शेलारांनी केला. म्हणजेच 2019च्या निकालानंतर फडणवीस-अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी जो महाराष्ट्रानं पाहिला..त्याआधीच 2017मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता महाराष्ट्रात असती. आशिष शेलार जे बोलले ते 23 जून 2020 ला खुद्द फडणवीसही बोलले आहेत..काँग्रेसला एकटं पाडण्यासाठी राष्ट्रवादीला सोबत येण्याचा प्रस्ताव आला होता. आणि पवारांशीही बोलणं झालं होतं, असं फडणवीस म्हणाले होते. 2014 ते 2019 पर्यंत युतीच्या काळात भाजप-शिवसेनेचे खटके उडतच होते. त्यावेळी शिवसेनेचे मंत्री खिशातले राजीनामे दाखवून भाजपला इशारे देत होते..तेव्हाच राष्ट्रवादीचा भाजपनं पर्याय शोधल्याचं बोललं जातंय. त्यामुळं 2017 मध्येच राष्ट्रवादीसोबत गेलो असतो तर बरं झालं असतं. त्यावेळी शिवसेनेचा विचार केल्यानं आता प्रायश्चित्त भोगतोय, असं मुनगंटीवार म्हणालेत.