Ashish Shelar : ‘…मग तुम्ही रस्त्यावर गोट्या खेळा’, शेलारांची राज ठाकरेंवर टीका

Ashish Shelar : ‘…मग तुम्ही रस्त्यावर गोट्या खेळा’, शेलारांची राज ठाकरेंवर टीका

| Updated on: Jul 06, 2025 | 12:17 PM

राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर आशीष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी केलेल्या एका वक्तव्यावर आशीष शेलार यांनी आता प्रत्युत्तर देत टीका केली आहे. तुमची सत्ता विधान भवनात आहे, आमची सत्ता रस्त्यावर आहे असं विधान राज ठाकरेंनी काल केलं होतं त्यानंतर आज आशीष शेलार यांनी त्यावर प्रत्युत्तर देत मग रस्त्यावर गोट्या खेळा असा टोला लगावला आहे.

ठाकरे बंधूंनी काल विजयी मेळावा घेतला. त्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला. राज्यात रद्द करण्यात आलेल्या हिंदी सक्तीच्या जीआरनंतर तुमची सत्ता ही विधान भवनात आहे. आमची सत्ता रस्त्यावर आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. यांच्यावर दुसऱ्या भाषेची सक्ती लादू नका, असा इशारा देखील ठाकरेंकडून देण्यात आला होता. त्यावर नेते आशीष शेलार यांनी आज ठाकरेंना प्रत्युत्तर देत टोला लगावला आहे. रस्त्यावर सत्ता आहे तर गोट्या खेळा असा टोला शेलार यांनी ठाकरे बंधूंना लगावला आहे.

Published on: Jul 06, 2025 12:17 PM