Controversial post : कर्नल कुरैशी, व्योमिका सिंह यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट; प्राध्यापक अटकेत

Controversial post : कर्नल कुरैशी, व्योमिका सिंह यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट; प्राध्यापक अटकेत

| Updated on: May 18, 2025 | 5:53 PM

Controversial post against women officers : कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्राध्यापकाला अटक करण्यात आलेली आहे.

कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट करण्यात आलेली आहे. याप्रकरणी हरियाणातील सोनीपत येथील अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान यांना अटक करण्यात आलेली आहे. याप्रकरणी हरियाणा महिला राज्य आयोगाने दखल घेतली होती.

हरियाणातील सोनीपत येथील अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना ऑपरेशन सिंदूरबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या महमूदाबाद यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर पत्रकार परिषद घेणाऱ्या विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांची चौकशी केली होती. त्यांनी पत्रकार परिषदेसाठी दोन महिला अधिकाऱ्यांना पाठवणे हे एक बनावट आणि ढोंग असल्याची टीका केली होती. ज्यामुळे वाद निर्माण झाला होता.

Published on: May 18, 2025 05:53 PM