BIG Breaking : मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?

BIG Breaking : मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?

| Updated on: Apr 30, 2025 | 5:09 PM

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची आज (23 एप्रिल) बैठक पार पडली. मोदी सरकारच्या या बैठकीत अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याचीच माहिती अश्विनी वैष्णव यांच्याकडून देण्यात आली.

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने जातीय जनगणनेसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात जातीनिहाय जनगणना केली जावी अशी मागणी सातत्याने गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून होत आहे. असे असताना बुधवारी झालेल्या केंद्र सरकारच्या बैठकीत मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. यामध्ये अनेक महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. याच निर्णयांमध्ये जातिनिहाय जनगणनेबाबतही निर्णय झाला.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, काँग्रेस सरकारने जातीय जनगणनेला विरोध केला आहे. प्रस्ताव असूनही काँग्रेसने फक्त एक सर्वेक्षण केले. काँग्रेसने याचा फायदा घेतला. तर महाआघाडीने लोकसभा निवडणुकीत जातीय जनगणनेला प्रचाराचा मुद्दा बनवला होता. आम्ही सत्तेत आलो तर देशभारत जातनिहाय जनगणना केली जाईल, असे आश्वासन देखील विरोधकांकडून देण्यात आले होते. असे असतानाच आता मात्र केंद्राने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे.

Published on: Apr 30, 2025 05:09 PM