Saqib Nachan : दहशतवादी कारवायांत 3 वेळा अटक, पडघ्याला इस्लामिक सिरिया करायचं होतं; कोण आहे साकीब नाचन?

Saqib Nachan : दहशतवादी कारवायांत 3 वेळा अटक, पडघ्याला इस्लामिक सिरिया करायचं होतं; कोण आहे साकीब नाचन?

| Updated on: Jun 02, 2025 | 5:20 PM

Maharashtra ATS Raids Padgha : महाराष्ट्र एटीएसकडून भिवंडीत छापेमारी केली आहे. यात साकीब नाचन याच्या घरावर देखील छापा मारला आहे.

पडघा – भिवंडीमध्ये एटीएसची कारवाई अद्यापही सुरूच आहे. आत्तापर्यंत एटीएसकडून दोघांना अटक करण्यात आलेली आहे. तर 10 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. साकीब नाचन आणि दहशतवाद्यांचा तळ अशी या बोरिवली गावची ओळख आहे. विशेष म्हणजे या आधी देखील या गावात दहशतवाद्यांचा तळ होता. दहशतवादी हालचालींचा संशय असल्याने साकीब नाचन याच्या घराची झडती घेतली जात आहे.

साकीब नाचनमुळे याआधी देखील बोरिवली गाव चर्चेत आलेलं होतं. पडघातल्या बोरिवली या गावातलाच साकीब हा रहिवासी आहे. बंदी घातलेल्या सीमी संघटनेचं काम साकीब याच भागातून करत होता. साकीबला आत्तापर्यंत 3 वेळा दहशतवादी कारवायांमुळे अटक झाली आहे. 1990मध्ये बॉम्बस्फोट, दहशतवादी कारवाया वाढल्या होत्या तेव्हा खलिस्तानी अतिरेक्यांबरोबर साकीबला अटक करण्यात आली होती. त्यावेळी गुजरातच्या टाडा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पण पाच वर्ष तुरुंगात राहिल्यावर नाचनची सुटका झाली. त्यानंतर पुन्हा 2002-2003 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात त्याला अटक करण्यात आली. अटकेनंतर साकीबला ठाणे कारागृहात ठेवण्यात आलं. पुन्हा वर्तणूक चांगली असल्याचं सांगत त्याची 5 महीने आधीच सुटका करण्यात आली. यावेळी ठाणे कारागृहाबाहेर त्याला भेटण्यासाठी मोठी गर्दी झालेली. 2023मध्ये नाचनला पुन्हा अटक झाली. सध्या तो कोठडीतच आहे. साकीबने पडघ्याला स्वतंत्र क्षेत्र म्हणून घोषित केलं होतं, असा संशय पोलिसांना आहे. साकीबला अल-शाम म्हणजेच एक प्रकारचा इस्लामिक सिरिया पडघ्यात तयार करायचा होता. त्याने पडघा गावाला अल-शाम असं नाव देखील दिलं होतं.

Published on: Jun 02, 2025 05:20 PM