Aurangabad | पुराच्या पाण्यात दुचाकी घालणे पडले महागात, दोन तरुण दुचाकीसह पुरात वाहून गेले

| Updated on: Jun 10, 2021 | 8:59 AM

फुलंब्री तालुक्यातील पानवडोद गावातील दोन तरुणांना पुराच्या पाण्यात दुचाकी घालणे महागात पडले. हे दोघेही तरुण दुचाकीसह पुरात गेले वाहून गेले. तुफान आलेल्या पुरात नदीच्या पुलावरुन दुचाकी घालणे तरुणांना चांगलंच महागात पडलं. मात्र सुदैवाने वाहून जाणाऱ्या दोन्ही तरुणांचे प्राण वाचले आहेत.

Follow us on

फुलंब्री तालुक्यात पावसाचा कहर पाहायला मिळतोय. फुलंब्री तालुक्यातील पानवडोद गावातील दोन तरुणांना पुराच्या पाण्यात दुचाकी घालणे महागात पडले. हे दोघेही तरुण दुचाकीसह पुरात गेले वाहून गेले. तुफान आलेल्या पुरात नदीच्या पुलावरुन दुचाकी घालणे तरुणांना चांगलंच महागात पडलं. मात्र सुदैवाने वाहून जाणाऱ्या दोन्ही तरुणांचे प्राण वाचले आहेत. फुलंब्री तालुक्यातील फुलमस्ता नदीच्या पुलावर ही धक्कादायक घटना घडली.नदीला पूर आलेला दिसतोय. पाण्याचा वेग आणि पातळी मोठी होती. मात्र तरुणांनी आगाऊपणा म्हणा किंवा अतिआत्मविश्वासाने म्हणा नदीच्या पुलावर गाडी घातली. मात्र पाण्याला वेग जास्त असल्याने तरुण दुचाकीसह तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेले. मात्र त्या दोन तरुणांचे सुदैवाने प्राण बचावले. दुचाकीसह तरुण पुराच्या पाण्यात वाहून जातानाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.