Aurangabad rain : अजिंठा लेणी परिसरातील सातकुंड धबधबा कोसळला

| Updated on: Sep 08, 2021 | 8:38 AM

प्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात जोरदार पाऊस झाला. सलग दोन दिवस या परिसरात तुफान पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अजिंठा लेणीवरील सातकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे. अजिंठा लेणीसमोर असणाऱ्या वाघूर नदीला पूर आला आहे. काल दिवसभर इथे तुफान पाऊस होता.

Follow us on

औरंगाबाद : प्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात जोरदार पाऊस झाला. सलग दोन दिवस या परिसरात तुफान पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अजिंठा लेणीवरील सातकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे. अजिंठा लेणीसमोर असणाऱ्या वाघूर नदीला पूर आला आहे. काल दिवसभर इथे तुफान पाऊस होता. अजिंठा आणि परिसरातील शेतकऱ्यांचेही नुकसान झालं आहे. दरम्यान औरंगाबादसह मराठवाड्याला पावसाने चांगलंच झोडपलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील लासुर परिसरात शिवना नदीला तुफान पूर आला.  नदीला आलेल्या पुरामुळे नागपूर मुंबई महामार्गावरील वाहतूक बंद झाली. लासुर गावातील दाक्षायनी मंदिरात पाणी घुसले. नागपूर मुंबई महामार्गावरून अजूनही पाणी सुरूच आहे.