Tokyo Paralympics | नेमबाज अवनीची सुवर्ण कामगिरी, टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक

| Updated on: Aug 30, 2021 | 9:37 AM

टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये (Tokyo Paralympics) भारताने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत महिला नेमबाज अवनी लेखराने (Avani Lekhara) सुवर्णवेध घेतला आहे. भारताच्या खात्यातील हे पहिलं गोल्ड मेडल (Gold Medal) आहे. अवनी लेखराने 10 मीटर एयर स्टँडिंग प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं.

Follow us on

टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये (Tokyo Paralympics) भारताने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत महिला नेमबाज अवनी लेखराने (Avani Lekhara) सुवर्णवेध घेतला आहे. भारताच्या खात्यातील हे पहिलं गोल्ड मेडल (Gold Medal) आहे. अवनी लेखराने 10 मीटर एयर स्टँडिंग प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. अवनीच्या या कामगिरीने तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन, अवनीवर स्तुतीसुमनं उधळली. तर भारताच्या योगेश कठुनिया यानेही थाळीफेकीत भारताला रौप्यपदक मिळवून दिलं. | Avani Lekhara win gold medal in Tokyo Paralympics