Bachchu Kadu : बावनकुळेंची भाषा मला बरोबर वाटली नाही – बच्चू कडू
Bachchu Kadu Hunger Strike : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी हे उपोषण सुरू केलं आहे.आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे.
बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस आहे. बच्चू कडू यांचं वजन 2 किलोंनी घटलं आहे. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी हे उपोषण सुरू केलं आहे. काल पवारांनी बच्चू कडू यांना फोन देखील केला होता. तर आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील कडू यांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी जाणार आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी आग्रह केल्यानंतर मी बीपीची गोळी घेतली असं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. काल जिल्हाधिकारी भेटीला आले असता त्यांनी मंत्री बावनकुळे यांच्याशी फोनवर माझं बोलण करून दिलं. मात्र तेव्हा बावनकुळे यांची भाषा मला बरोबर वाटली नाही. जिल्हाधिकारी आलेले आहेत तर तुम्ही उपोषण सोडून घ्या, नंतर या विषयावर आम्ही मीटिंग लाऊ, असं बावनकुळे म्हणाले. पण ही तानाशाहीची भाषा होती, असं बच्चू कडू यावेळी म्हणाले.
Published on: Jun 11, 2025 09:06 AM
