सरकारला भिकारी म्हटल्यानं मिरची लागली; बच्चू कडू यांचा टोला

सरकारला भिकारी म्हटल्यानं मिरची लागली; बच्चू कडू यांचा टोला

| Updated on: Jul 23, 2025 | 4:34 PM

प्रहारचे माजी आमदार बच्चू कडू यांनी आज माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर भाष्य करत सरकारवर टीका केली.

कृषिमंत्री कोकाटे पहिल्यांदा खरं बोलले त्यामुळे त्यांच्यावर ही आपत्ती आली असं बच्चू कडू यांनी म्हंटलं आहे. सरकार भिकारी आहे असं म्हंटल्याबरोबर सरकारला मिरची लागली असंही बच्चू कडू यावेळी बोलले. शेतकरी भिकारी आहे म्हंटल्यावर कोकाटे यांचा राजीनामा घेतला नाही, असंही ते म्हणाले.

यावेळी बोलताना माजी आमदार बच्चू कडू यांनी म्हंटलं की, सरकारने अजून कर्जमाफीची तारीख सांगितली नाही. कर्जमाफीची गरज आहे की नाही हे तपासा लागल असं सरकार म्हणते. आश्वासन दिल तेव्हा असं सांगितलं होत का की चांगलं पीक असेल तर कर्ज माफ होणार नये वाईट पीक असल तर होईल. आमचे प्रश्न जोपर्यंत मार्गी लागणार नाही तोपर्यंत आंदोलन करू यापेक्षा आक्रमक आंदोलन करू. ओबीसी, मराठा आदिवासी सर्व संघटना यांनी आम्हाला पाठिंबा दिला. काँग्रेसच्या काही, ठाकरेंच्या काही राष्ट्रवादीच्या आणि मनसेच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. पहिल्यांदा कोकाटे खरे बोलले त्यामुळे त्यांच्यावर ही आपत्ती आली. शेतकरी भिकारी आहे म्हटल्यावर कोकाटे यांचा राजीनामा घेतला नाही आणि सरकार भिकारी आहे असं म्हटल्याबरोबर सरकारला मिरची लागली. सरकारला शेतकऱ्यापेक्षा स्वतःला बोललं त्याचं वाईट वाटलं. आम्हाला विनाकारण त्रास दिला तर आंदोलनाचे स्वरूप बदललं जाईल काही पोलीस अधिकाऱ्यांचे मला फोन आले आहे, असंही कडू यांनी सांगितलं.

Published on: Jul 23, 2025 04:34 PM