BMC Election 2025 : भाजप नंबर 1 करण्यासाठी मेहनत घ्या, फडणवीसांच्या सूचना; शिंदेंचा कानमंत्र काय? तर दादांच्या हालचाली काय?
राजकीय रणनितीकार नरेश अरोरा अजित पवार यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेत. आरोरांच्या डिझाईन बॉक्सने राष्ट्रवादीसाठी विधानसभेसाठी काम केलं होतं. आगामी निवडणुकांसाठी अरोरांची कंपनीच दादांच्या राष्ट्रवादीचं काम करण्याची शक्यता आहे.
आगामी पालिका निवडणुकांसाठी महायुतीत बैठकांची मालिका सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’वर भाजप मंत्री आणि नेत्यांसोबत चर्चा केली आहे. भाजपला नंबर वन करण्यासाठी मेहनत घ्या, अशा सूचना देवेंद्र फडणवीसांनी या बैठकीत दिल्यात. यासह देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्व मंत्र्यांवर विभागनिहाय जबाबदारीचं वाटप करण्यात आलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबईत जबाबदारीचं वाटप करण्यात आलंय. तर आगामी निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा, असा कानमंत्र पक्षातील मंत्र्यांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी दिलाय. दरम्यान, ठाकरे गटातील स्थानिक नेत्यांच्या पक्षप्रवेशाची मंत्री आणि नेत्यांवर जबाबदारी देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. तर अजित पवारांच्या गटातही यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यात. बघा नेमकं काय घडतंय?
