राज्यात खळबळ उडवून देणारे दोन दावे, अजित पवार आणि संजय राऊत केंद्रस्थानी… पहा त्यावर हा स्पेशल रिपोर्ट
जित पवार यांनी एका मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्रीपदाबद्दल मोठा दावा केला. तसेच आगामी 2024 च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची आपली तयारी असल्याचे ते म्हणाले.
मुंबई : राज्यात सध्या दाव्यांमुळे चांगलीच राळ उडालेली आहे. तर खळबळही. याच्याआधी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 15 दिवसांत राज्यात भूकंप होणार म्हटलं आणि खळबळ उडाली. यानंतर अजित पवार नॉरिचेबल झाले आणि खळबळ उडाली. हा धुरळा शांत होतो न होतो तोच विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दावे करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. अजित पवार यांनी एका मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्रीपदाबद्दल मोठा दावा केला. तसेच आगामी 2024 च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची आपली तयारी असल्याचे ते म्हणाले. यानंतर खासदार संजय राऊत यांनी देखील मोठा दावा करत शिंदे-फडणवीस सरकारचं डेथ वॉरंट निघालं आहे. येत्या 15 ते 20 दिवसात शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याची भविष्यवाणी संजय राऊत यांनी केली आहे. या दोन वेगवेगळ्या वक्तव्यांवर वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ज्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पहा त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट
