Pakistan BIG news : पाकिस्तानला मोठा धक्का, बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?

Pakistan BIG news : पाकिस्तानला मोठा धक्का, बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?

| Updated on: May 08, 2025 | 3:56 PM

बलुच लिबरेशन आर्मी म्हणजेच बीएलएने पाकिस्तानी सैन्याविरुद्ध आणखी एक मोठा बदला घेतला आहे. बलुचिस्तान प्रांतातील बोलन परिसरात १२ पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत.

पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. दहशतवादाला आश्रय देणारा पाकिस्तान सतत समस्यांनी वेढला जात आहे. एकीकडे भारत पाकिस्तानात बसलेल्या दहशतवाद्यांवर हल्ला करत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानच्या लष्करावर त्यांच्याच बलुचिस्तानात सतत हल्ले होत आहेत. अशातच बलुच नागरिकांनी पाकिस्तानचे झेंडे उतरवले असल्याची मोठी माहिती समोर मिळतेय. तर बलुचिस्तानमध्ये बलुच नागरिकांनीच पाकिस्तानचे झेंडे खाली उतरवत स्वतःचे वेगळे झेंडे फडकावले आहे. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का असून पाकिस्तानची आणखी डोकेदुखी वाढली आहे. पश्चिम सीमेवर सीमावर्ती भागात पाकिस्तानची भारतासह युद्धजन्य परिस्थिती आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानातील बलुच नागरिकांनी पाकिस्तानातील झेंडे उतरवत स्वतःचे वेगळे झेंडे हाती घेत बलुच नागरिक बंडाचं निशाण हाती घेताना दिसताय.

बंडाचे कारण काय?

बलुचिस्तानमधील बंडखोरीचे मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानमधील या प्रदेशाविरुद्ध आणि त्याच्या लोकसंख्येविरुद्ध होणारा भेदभाव. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानमधील बहुतेक खनिजे आहेत परंतु आर्थिक विकासात तो सर्वात मागासलेला प्रदेश आहे. पाकिस्तानने बलुचिस्तानला लागून असलेले ग्वादर बंदर चीनला सोपवले पण बलुचिस्तानला या प्रकल्पाचा कोणताही फायदा मिळाला नाही. अशा परिस्थितीत बलुचिस्तानमध्ये चीनच्या प्रकल्पाविरुद्ध सतत निदर्शने होत आहेत.

Published on: May 08, 2025 03:56 PM