जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महानगर पालिका निवडणूकीत आमच्या छोट्या समाज घटनांना तिकीट द्यावे अशी मागणी बारा बुलतेदार महासंघाने केली आहे. आमदार सुरेश भोळे यांना या महासंघाने निवदेन देऊन मागणी केली आहे.
जळगाव महानगर पालिकेत आम्हाला प्रतिनिधीत्व द्यावे अशी मागणी बारा बुलतेदार महासंघाने केली आहे. आम्ही भाजपाला लोकसभा, विधानसभा निवडणूकीत मदत केलेली आहे. आमच्या समाजामुळे भाजपाचे मतदान आठ ते नऊ टक्क्यांनी वाढले आहे असा दावा बारा बुलतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष भारती कुमावत यांनी केला आहे. आमच्या बारा बुलतेदार, अठरा अलुतेदार आणि मायक्रो ओबीसी यांच्यापैकी पाच सदस्यांना जळगाव महापालिकेत तिकीट द्यावे अशी मागणी विभागीय अध्यक्ष मुकुंद मेटकर यांनी केली आहे. आमच्या या छोट्या समाजांना नेतृत्व देण्याची संधी द्यावी अशी मागणी मेटकर यांनी केली आहे. जर आमच्या समाज घटकांना संधी दिली नाही तर आम्ही आंदोलन करणार नाही. परंतू आम्ही इतर सर्व मार्गांचा सनदशीर मार्गांचा अवलंब करु असेही मेटकर यांनी म्हटले आहे.
Published on: Dec 27, 2025 12:43 PM
