दुगारवाडी धबधबा वाहतोय ओसांडून, पाहा ड्रोनद्वारे विहंगम दृश्य

| Updated on: Aug 04, 2023 | 11:31 AM

नाशिकमध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी जिल्ह्यात झालेल्या रिमझिम पावसामुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इगतपुरी भागात हिरवळ पसरली आहे. हिरव्या गर्द झाडीतून वाहणारा दुगारवाडी धबधबा सध्या सगळ्याच पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतोय.

Follow us on

नाशिक, 4 ऑगस्ट 2023 | नाशिक मध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी जिल्ह्यात झालेल्या रिमझिम पावसामुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इगतपुरी भागात हिरवळ पसरली आहे. हिरव्या गर्द झाडीतून वाहणारा दुगारवाडी धबधबा सध्या सगळ्याच पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतोय. मधल्या काळात या धबधब्यावर झालेल्या दुर्घटनांमुळे इथे पर्यटकांना प्रवेश बंदी असली तरी दुरून दिसणारा आणि हिरव्या गर्द झाडीतून उंचावरून कोसळणारा दुगारवाडीचा धबधबा बघण्यासाठी पर्यटक लांबून का होईना पण आनंद घेतात. नाशिकच्या त्रंबकेश्वर इथल्या सापगाव परिसरात असलेल्या दुगारवाडी धबधब्याचे ड्रोनच्या माध्यमातून घेतलेलं हे खास दृश्य tv9 च्या प्रेक्षकांसाठी