बीडकरांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस, खासदार प्रीतम मुंडे म्हणतात… असं नाही?

| Updated on: Sep 23, 2022 | 10:44 AM

मराठवाड्यातील विद्यार्थी, शेतकरी, उद्योगांसाठी ही रेल्वे महत्त्वाची ठरणार आहे. आष्टी ते बीड अशा 67 किमी अंतरात ही रेल्वे धावेल. दरम्यान 10 रेल्वे स्टेशन असतील.

Follow us on

महेंद्रकुमार मुधोळकर, बीडः बीड (Beed) जिल्ह्यानं स्वातंत्र्यापासून पाहिलेलं एक स्वप्न आज पूर्णत्वास येत आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी ते नगर दरम्यान पहिल्यांदा रेल्वे धावत आहे. आज रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते एका भव्य कार्यक्रमाद्वारे या रेल्वेला हिरवा कंदिल दाखवण्यात येईल. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी मात्र ही बीडकरांची स्वप्नपूर्ती नाहीच, असं म्हटलंय. टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बातचित करताना त्या म्हणाल्या, खरं तर ही स्वप्नपूर्ती म्हणणार नाही. त्या दिशेनं पडलेलं मोठं पाऊल आहे. नगर-बीड-परळी ज्या दिवशी पूर्णपणे धावेल. ती रेल्वे पुढे जाऊन कल्याण-मुंबईपर्यंत जाईल त्या दिवशी आमचं स्वप्न पूर्ण होईल. महाविकास आघाडीने या रेल्वे प्रकल्पाचे पावणे चारशे रुपये मागचे तीन वर्ष थकवले. पण आता सरकार बदल झाल्यामुळे वेगाने प्रकल्प मार्गी लागल्याचं प्रीतम मुंडे म्हणाल्या. मराठवाड्यातील विद्यार्थी, शेतकरी, उद्योगांसाठी ही रेल्वे महत्त्वाची ठरणार आहे. आष्टी ते बीड अशा 67 किमी अंतरात ही रेल्वे धावेल. दरम्यान 10 रेल्वे स्टेशन असतील.