Namdev Shastri : ‘मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन् ते पुन्हा त्याच पदावर…’, नामदेव शास्त्रींकडून पाठराखण

Namdev Shastri : ‘मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन् ते पुन्हा त्याच पदावर…’, नामदेव शास्त्रींकडून पाठराखण

| Updated on: Apr 17, 2025 | 5:28 PM

आज संत भगवान बाबा गडाचा नारळी सप्ताहाची सांगता शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर या गावी होत आहे. यावेळी महंत नामदेव शास्त्री यांच्या काल्याच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यातून महंत नामदेव शास्त्री यांनी मुंडेंची पाठराखण केल्याचे दिसून आले.

संत भगवानबाबा गडाचा नारळी सप्ताहाची सांगता बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे होत आहे. नारळी सप्ताहाची सांगता समारंभात भगवानबाबा गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होतं. यावेळी आपल्या कीर्तनातून नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले. धनंजय मुंडे यांच्या गालावरून वारं गेलं आहे. चांगली वाणी बंद पडलेली आहे. त्यामुळे मुंडे यांच्यासाठी सर्वांनी प्रार्थना करण्याचं आवाहन नामदेव शास्त्री यांनी केलं आहे. इतकंच नाहीतर ते पुढे असेही म्हणाले की, पहिल्या पदावर येऊन धनंजय मुंडे यांच्या हातून समाजकल्याण घडावं, असंही यावेळी बोलताना नामदेव शास्त्री म्हणालेत. तर भगवानबाबा जेव्हा मारतात तेव्हा त्यांच्या काठीचा आवाज येत नाही. भगवानगडाशी छेडछाड करु नका, असं नामदेव शास्त्रींनी म्हटलंय. दरम्यान, नामदेव शास्त्रींचा रोख नेमका कुणाकडे याची सध्या चर्चा होत आहे.

Published on: Apr 17, 2025 04:58 PM