Suresh Dhas : जेलमध्ये आका वापरत असलेल्या छोट्या स्पेशल फोनचे डिटेल्स काढले तर…धसांच्या दाव्यानं खळबळ
21 ऑक्टोंबर 2023 रोजी बीडच्या परळीतून महादेव मुंडेंची हत्या झाली. मात्र अद्याप मारेकरी मोकाट असल्याचे आरोप महादेव मुंडे यांच्या पत्नी करताय. अशातच सुरेश धस यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने एक मोठं आणि महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. वाल्मिक कराड हे संतोष देशमुख खंडणी प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तर वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे, असं कोर्टानं निरीक्षण नोंदवलं आहे. अशातच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा विषय लावून धरणारे भाजपचे बीडचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडवर वक्तव्य केलंय.
वाल्मिक कराड असलेल्या जेलमधून एक छोटा फोन सापडला, असा दावा करत या फोनच्या डिटेल्स घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे सुरेश धस म्हणाले. ‘जेलमध्ये एक स्पेशल फोन सुद्धा सापडला आहे. मी मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे. तो छोटा फोन जो आका वापरत होते, त्याचे डिटेल्स जर घेतलेत, तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. महादेव मुंडेंचं प्रकरण मी स्वतः बाहेर काढलंय. त्यापूर्वी कोणीही बोलत नव्हतं असेही धस म्हणाले.
