Beed : माणुसकीची मिठी आणि जिव्हाळ्याची साथ, हंबरडा फोडणाऱ्या गर्भवतीला डॉक्टरचा शब्द, ताई घाबरु नको!
कोरोनामुळे घाबरुन हंबरडा फोडणाऱ्या गर्भवतीला धीर देण्यासाठी डॉक्टरांची जिव्हाळ्याची मिठी

Beed : माणुसकीची मिठी आणि जिव्हाळ्याची साथ, हंबरडा फोडणाऱ्या गर्भवतीला डॉक्टरचा शब्द, ताई घाबरु नको!

| Updated on: Apr 30, 2021 | 12:04 PM

बीड जिल्ह्यात कोरोनाचा (Beed Corona cases) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. यात सरकारी आणि खासगी डॉक्टर जीव पणाला लावून रुग्णांवर उपचार करत आहेत . कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) आल्यानंतर अनेक लोक घाबरून जातात. गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील एक सहा महिन्यांची गर्भवती महिला पॉझिटिव्ह आली. आता पुढे काय होईल या भीतीपोटी ही महिला काकुळतीला आली. डॉक्टरांकडे गेल्यानंतर या महिलेने थेट हंबरडा फोडला.