Suresh Dhas : संतोष देशमुख पार्ट 2 झाला असता, पण.., शिवराज दिवटे मारहाण प्रकरणावर धसांची संतप्त प्रतिक्रिया
MLA Suresh Dhas On Parali Crime Case : परळी येथील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी आष्टीचे भाजप आमदार सुरेश धड यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केलेला आहे.
ज्या पद्धतीने सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण झाली, तीच सगळी भाषा शिवराज दिवटे प्रकरणात वापरली आहे. ही मारहाणीची घटना अमानवी आहे. जे चुकीचं वागतील त्यांची धिंड पोलीसदलाने जनतेतून काढली पाहिजे, असं आमदार सुरेश धस यांनी म्हंटलं आहे. बीडमधील परळीच्या शिवराज दिवटे याला अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे. टोळक्याकडून मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
बीड जिल्ह्यातील परळी येथे शिवराज दिवटे या तरुणाचे अपहरण करून समाधान मुंडे आणि त्याच्या 10 ते 15 साथीदारांच्या टोळक्याने त्याला बेदम मारहाण केली. शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या अमानुष घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शिवराज दिवटे याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी परळी पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. यावर बोलताना धस पुढे म्हणाले की, अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील काही डॉक्टर एकाच ठिकाणी पंधरा वर्षांपासून आहे. हेच डॉक्टर पाय मोडला तरी खरचटले म्हणून अहवाल देतात. त्यामुळे अशे डॉक्टर मकोकामध्ये आरोपी झाले पाहिजे, याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं देखील आमदार सुरेश धस यांनी सांगितलं आहे.
