Karuna Sharma : …नाहीतर तुम्ही तुमचा पक्ष बंद करा, अजितदादा लक्षात ठेवा… मुंडेंच्या मंत्रिपदावरून करूणा शर्मा भडकल्या

Karuna Sharma : …नाहीतर तुम्ही तुमचा पक्ष बंद करा, अजितदादा लक्षात ठेवा… मुंडेंच्या मंत्रिपदावरून करूणा शर्मा भडकल्या

| Updated on: Jul 26, 2025 | 6:02 PM

करुणा मुंडे टीव्ही 9 मराठीशी बोलत असताना त्या आक्रमक झाल्यात. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिलं तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आम्ही धनंजय मुंडे यांना सहआरोपी करू. त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

कृषी विभागाच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाने नुकतीच क्लिनचीट दिलीं यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात मोठे संकेत दिलेत. अजित पवार यांच्याकडून धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपदी संधी देणार असल्याचे दादांनी म्हटले. दरम्यान वाल्मिक कराड प्रकरणाशी संबंध न आढळल्यास धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपदी संधी देऊ अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

अजित पवार यांच्या या सूचक विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. अशातच करूणा शर्मा यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देताना अजित पवार यांनी एक बाब लक्षात ठेवली पाहिजे. अजित पवार हे लोकप्रतिनिधी आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचे तुम्हाला दु:ख दिसत नाही. महादेव मुंडे, झरीन शेख, काका गर्जे अशी अनेक प्रकरणं आहेत. शासन, प्रशासनाला हाताशी धरून या लोकांनी बीडमध्ये काळा बाजार करून ठेवलाय, असं म्हणत करूणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावरून भडकल्या. इतकंच नाहीतक तुमच्याकडे चांगले लोक नसतील तर तुमचा पक्ष बंद करून टाका, असा थेट सल्लाच करूणा शर्मा यांनी अजित पवारांना दिला.

Published on: Jul 26, 2025 06:02 PM