Vaibhavi Deshmukh : खंत वाटते वडील सोडून गेले… वैभवी देशमुख सरपंच देशमुखांच्या जाण्यानं भावूक

Vaibhavi Deshmukh : खंत वाटते वडील सोडून गेले… वैभवी देशमुख सरपंच देशमुखांच्या जाण्यानं भावूक

| Updated on: Jun 15, 2025 | 6:06 PM

माझ्या वडिलांची हत्या करणाऱ्या आरोपींना आणि त्यांना पाठबळ देणाऱ्यांना प्रशासनाने कारवाई केली तर गुन्हे थांबतील, असे म्हणत प्रशासनाने लवकरात लवकर आरोपीला शोधलं पाहिजे, अशी आशाही वैभवीने व्यक्त केली.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने बारावीमध्ये ८५ टक्के गुण मिळवल्यानंतर नीट परिक्षेतही घवघवीत येश मिळवलंय. यानंतर टीव्ही ९ मराठीशी बोलताना वैभव देशमुख हिने आपल्या वडिलाची उणिव जाणवत असल्याचे बोलून दाखवले. वैभवी म्हणाली, मी सर्वांचे आभार मानते की माझे सर्वांनी कौतुक केले. आज खंत वाटते की आशीर्वादाचा हात आणि कौतुकाची थाप आज माझ्या वडिलांची माझ्या पाठीवर नाही. महाराष्ट्राने दिलेली साथ समाजाने दिलेला आशीर्वाद माझ्या वडिलांच्या कृपेने त्यांच्या डोळ्यांमध्ये जे स्वप्न होते ते आम्ही नक्की पूर्ण करू त्यांचे आशीर्वादाचा हात नेहमीच माझ्या पाठीवर राहील. नीट परीक्षेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे सुप्रिया सुळे आणि अनेक नेत्यांचे फोन आल्याचेही तिने सांगितले.

संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. परंतु माझ्या आयुष्यात आलेलं संकट म्हणजे माझ्या वडिलांची झालेली अमानवी हत्या असं संकट कोणावर येऊ नये, ही माझी मनापासून इच्छा आहे. हे जे दुःख होतं हे आमच्यासाठी खूप मोठे दुःख होतं. आंदोलन हे तात्पुरतं स्थगित केलं आहे. पण आंदोलन आम्ही करू त्या आंदोलनाची आता गरज भासत असल्याचे वैभवी देशमुखने म्हटलंय.

Published on: Jun 15, 2025 06:06 PM