Satish Bhosale Arrested Video : सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण ‘खोक्या’ प्रयागराजला पोहोचलाच कसा?

Satish Bhosale Arrested Video : सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण ‘खोक्या’ प्रयागराजला पोहोचलाच कसा?

| Updated on: Mar 13, 2025 | 4:55 PM

अहिल्यानगरमध्ये खोक्या भोसलेने टीव्ही नाईन मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीनंतर खोक्या भोसलेला पकडण्यासाठी बीड पोलीस अहिल्यानगरमध्ये आले. मात्र खोक्या भोसलेने पुन्हा पोलिसांना गुंगारा देत छत्रपती संभाजीनगर गाठलं.

सतीश उर्फ खोक्या भोसलेची ट्रान्झिट रिमांड मिळाली आहे. प्रयागराज न्यायालयाकडून खोक्या भोसलेला ट्रान्झिट रिमांड देण्यात आलेली आहे. खोक्या भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीड पोलिसांनी सतीश उर्फ खोक्या भोसलेचा ताबा घेतला आहे. प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून बीड पोलिसांनी खोक्याचा ताबा घेतलेला आहे.

खोक्या प्रयागराजला कसा पोहोचला?, असा संपूर्ण घटनाक्रम

१. सतीश उर्फ खोक्या भोसलेला प्रयागराज कोर्टिकडून ट्रान्झिट रिमांड मिळाली.
२. सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे.
३. बीडवरून गेलेल्या पोलिस पथकाने खोक्याला प्रयागराज एअरपोर्ट पोलिसांकडून ताब्यात घेतलं आहे.
४. खोक्याला आता बीडमधील शिरूर कोर्टात हजर करून पोलिस कोठडी मागणार आहेत.
५. आज खोक्याला बीडमध्ये आणलं जाईल, मुंबई किंवा संभाजीनगर विमानतळावर आणण्याची शक्यता आहे.
६. आज सायंकाळपर्यंत खोक्या भोसलेला बीड जिल्ह्यात आणलं जाईल.
७. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये खोक्या भोसलेला बेड्या ठोकण्यात आल्या.
८. बीड पोलिस आणि उत्तर प्रदेश पोलिसांची ही संयुक्त कारवाई आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सतीश उर्फ खोक्या भोसले शिरूर कासारमधून फरार झाला. अटकेच्या भीतीने खोक्या भोसले शिरूर कासार सोडून सुरुवातीला पुण्यात गेला. पुणे शहर ग्रामीण हद्दीत खोक्या भोसले एक दिवस मुक्कामी होता. पुण्यानंतर खोक्या अहिल्या नगरमध्ये गेला आणि तिथेही त्याने एक दिवस मुक्काम केला. यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या एका तारांकित हॉटेलमध्ये दुसऱ्याच्या नावाने त्याने रूम बुक करून त्याने मुक्काम केला. छत्रपती संभाजीनगरनंतर खोक्याचा थांब ठिकाणा लागला तो थेट प्रयागराजमध्ये. खोक्या भोसले ट्रॅव्हल्सने प्रयागराजला गेल्याची माहिती समोर आली आहे. बीडचे एसपी नवनीत कॉवत यांनी प्रयागराज एसपींना फोन करून खोक्याचे डिटेल्स पाठवले. प्रयागराजमध्ये खोक्या उतरताच विमानतळ पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

Published on: Mar 13, 2025 04:55 PM