राणेजी हमको माफ करना! केस, भानगडी, जेल, मर्डर सगळं झालं… राणेंबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर गोगावलेंची माफी

राणेजी हमको माफ करना! केस, भानगडी, जेल, मर्डर सगळं झालं… राणेंबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर गोगावलेंची माफी

| Updated on: Jun 30, 2025 | 8:47 AM

कॅबिनेट बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी भरत गोगावले यांना सुनावले असे सूत्रांची माहिती आहे. खासदार नारायण राणे याबाबत केलेल्या वक्तव्यावरून नितेश राणे यांनी सुनावले याची माहिती सूत्रांची आहे. तर मंत्री भरत गोगावले यांनी नितेश राणे यांची माफीही मागितल्याचे कळतेय. कौतुक करताना अनावाधान वक्तव्य केल्याचा गोगावले यांचा खुलासा असे सूत्रांमार्फत कळतेय. तर पुन्हा असे वक्तव्य खपवून घेणार नाही असेही त्यांनी नितेश राणे यांनी म्हटले.

केंद्र सरकारमधले माजी मंत्री महाराष्ट्र राज्याचे माझी मुख्यमंत्री आणि विद्यमान भाजपचे खासदार नारायण राणे यांबद्दल मंत्री गोगावले यांनी धक्कादायक विधान केले. नारायण राणे हे राजकारणात इतक्या उंचीवर सहज गेलेले नाहीत. अंगावर केसेस घेतल्यात, भानगडी केल्यात आणि जेलमध्येही गेलेत, मारामारी केली आहे. मर्डर सगळं झालेलं आहे आणि हे कुणी वेगळं सांगण्याची गरज नाही. गोगावले यांच्या याच विधानावरून विरोधक सवाल करतायत. तर सत्ताधाऱ्यांना उत्तर देताना त्यांची चांगलीच दमछाक होतेय.

एकीकडे नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपचे मंत्री नितेश राणे यांचा दावा आहे की, नारायण राणे यांच्यावर मर्डर केसचा कोणताही पोलीस रेकॉर्ड नाहीये. मात्र खूनचे आरोप होणे आणि प्रत्यक्ष खून करणे यात फरक असल्याचे विधान शिंदे यांचे मंत्री सरनाईकांनी केले. मात्र खूनाचे आरोप असलेली व्यक्ती जर मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री राहिली असेल तर अशा लोकांपासून पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेला धोका असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Published on: Jun 30, 2025 08:47 AM