Mumbai | मुंबईत भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या, दोन तोतया NCBचे अधिकारी अटकेत

Mumbai | मुंबईत भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या, दोन तोतया NCBचे अधिकारी अटकेत

| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 8:15 PM

जोगेश्वरी पश्चिममध्ये राहणाऱ्या एका 28 वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीनं गुरुवारी आत्महत्या केल्याचं समोर आलं. मिळालेल्या माहितीप्रमाणे काही लोक स्वतःला एनसीबी अधिकारी असल्याचं सांगत कारवाईच्या नावाखाली खंडणी उकळत असल्याचं समोर आलंय.

मुंबई : भोजपुरी सिनेमा(Bhojpuri Actress)मध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीनं आत्महत्या (Suicide) केली असून तिला काही बोगस एनसीबी अधिकारी (Fake NCB official) खंडणीसाठी धमकावत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. मात्र या घटनेनंतर शहरात बोगस एनसीबी अधिकाऱ्यांची टोळी तर सक्रिय नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जोगेश्वरी पश्चिममध्ये राहणाऱ्या एका 28 वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीनं गुरुवारी आत्महत्या केल्याचं समोर आलं. मिळालेल्या माहितीप्रमाणे काही लोक स्वतःला एनसीबी अधिकारी असल्याचं सांगत कारवाईच्या नावाखाली खंडणी उकळत असल्याचं समोर आलंय. या टोळीच्या त्रासाला कंटाळून या अभिनेत्रीनं आत्महत्या केली. जोगेश्वरी पश्चिममधल्या कॅप्टन सामंत मार्गावरच्या सत्यम को-आप हाउसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या या तरूणीनं गळफास घेतला.