Manoj Jarange Patil : मोठी बातमी, 29 ऑगस्टच्या मुंबईतील आंदोलनापूर्वी जरांगे पाटलांना मोठा झटका
मुंबईत गणेशोत्सवादरम्यान मोठी गर्दी असते. हीच बाब लक्षात घेता जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. दोन आठवड्यापर्यंत त्यांना मुंबईत येता येणार नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलंय.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह आमरण उपोषणाला बसणार होते. या आंदोलनासाठी सगळा प्लान तयार झालेला असताना मनोज जरांगे पाटलांना मोठा झटका बसल्याचे समोर आले आहे. मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे. तर नवी मुंबईत खारघर किंवा इतर ठिकाणी सरकार परवानगी देऊ शकतं पण आझाद मैदानावर नाही, असं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे. दरम्यान, गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आला आहे. मुंबईत गणेशोत्सवाची चांगलीच धूम पाहायला मिळते. गणेशोत्सवात मुंबईत रहदारी विस्कळीत होऊ नये, यासाठी मनोज जरांगे पाटलांना मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे.
Published on: Aug 26, 2025 03:01 PM
