VIDEO : Pune | शिवसेनेचं काळीज वाघाचं – संजय राऊत
मी तर नेहमी आव्हान देतो शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा. मी राजकारण सोडतो, असं सांगतानाच ही मराठ्यांची औलाद आहे. आम्ही समोरून वार करतो, असा टोला राऊत यांनी लगावला. तसेच संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेनेचं काळीज वाघाचं आहे.
संजय राऊत आज शिरुर-हवेली इथे आले होते. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना राऊत यांनी थेट चंद्रकांत पाटील यांनाच ललकारले. चंद्रकांतदादा हरिश्चंद्राचे अवतार आहेत. आम्ही एकत्र काम केलंय. मी तर नेहमी आव्हान देतो शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा. मी राजकारण सोडतो, असं सांगतानाच ही मराठ्यांची औलाद आहे. आम्ही समोरून वार करतो, असा टोला राऊत यांनी लगावला. तसेच संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेनेचं काळीज वाघाचं आहे. सरकार आलं तरी प्रश्न तेच आहेत. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होतात. जेव्हा आमचं सरकार नव्हतं तेव्हा म्हणायचो आमचं सरकार आल्यावर बघू. मात्र आता बघयाची वेळ आलीये असं वाटतं, असा इशाराच त्यांनी राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे दिला.
