Bilawal Bhutto : युद्धाच्या धडकी भरली असताना बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत…

Bilawal Bhutto : युद्धाच्या धडकी भरली असताना बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत…

| Updated on: May 02, 2025 | 5:26 PM

पाकिस्तानचा भूतकाळ हा दहशतवादाशी संबंधित होता हे बिलावल यांनी मान्य केलं. ‘पाकिस्तानचा एक भूतकाळ आहे. यामुळे देशाने बरच काही सहन केलय’ असं बिलावल भुट्टो म्हणाले.

पाकिस्तान गेल्या तीन दशकापासून दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे वक्तव्य पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलं होतं. इतकंच नाहीतर पाकिस्तानात दहशतवादाला आश्रय मिळतो, असंही पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले होते. यानंतर आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी देखील याला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानचा एक भूतकाळ होता हे बिलावल भुट्टो यांनी मान्य केलं असून देशाला त्रास सहन करावा लागला असल्याचेही बिलावल भुट्टो यांनी म्हटलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना बिलावल भुट्टो म्हणाले की, पाकिस्तानचा एक भूतकाळ होता. आम्ही याची मोठी किंमत चुकवली आहे. त्यातून आम्ही धडा घेऊन खूप शिकलो. यातून अंतर्गत सुधारणा केलीय. हा सगळा इतिहास आहे, असं बिलावल भुट्टो म्हणाले.

Published on: May 02, 2025 05:26 PM