महायुती मित्रपक्षांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली?
महायुतीमधील मित्र पक्षांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महायुतीमधील मित्र पक्षांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्याने भाजपचं टेंशन वाढलं असल्याचं सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. महायुतीमधल्या मित्रपक्षांमुळे भाजप देखील टीकेचा घाणी ठरत आहे, अशीही चर्चा असल्याचं भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे. तर वादग्रस्त मंत्री, आमदारांच्या वर्तनामुळे भाजपच्या प्रतिमेला देखील् डाग लागत असल्याचं बोललं जात आहे.
बीडच्या संतोष देखमुख प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर आरोओ झाली. नंतर त्यांनी लवकर राजीनामा दिला नाही. अखेर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. तर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने माणिकरॉ कोकाटे अडचणीत आले आहेत. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेल लिलाव प्रक्रियेत अनियमितता, नंतर पैशांच्या बॅगचं व्हायरल व्हिडीओचं प्रकरण यामुळे मंत्री संजय शिरसाट देखील अडचणीत आले आहेत. तर वाळू उपसा प्रकरणी आणि नंतर सावली बार प्रकरणी योगेश कदम यांच्यावर देखील आरोप झालेले आहेत. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
