Lalbaugcha Raja 2025 : चिमुकल्या नातवासह अमित शाह अन् कुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक, बघा VIDEO

Lalbaugcha Raja 2025 : चिमुकल्या नातवासह अमित शाह अन् कुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक, बघा VIDEO

| Updated on: Aug 30, 2025 | 2:03 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीआज सहकुटुंब मुंबईतील 'लालबागच्या राजा'चं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील हजर होते

केंद्रीय मंत्री अमित शाह दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त मुंबई दौऱ्यावर आहेत. आज शनिवारी अमित शाह यांनी आपल्या चिमुकल्या नातू आणि परिवारासह मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शन घेतलं. यावेळी अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आशिष शेलार यांच्यासह भाजपाचे नेतेही उपस्थित होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. दरवर्षी अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. यंदाही अमित शाह सहकुटुंब लालबागच्या चरणी लीन झाल्याचे पाहायला मिळाले.

मुंबईत दाखल झाल्यानंतर अमित शाह यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानावरील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी फडणवीसांच्या निवासस्थानी अमित शाहांच्या हस्ते वर्षावरील बाप्पााची आरतीही करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह काही राजकीय नेतेमंडळीही उपस्थित होते.

Published on: Aug 30, 2025 01:53 PM