‘फडणवीस गप्प का?’ ‘सामना’तून केलेल्या प्रश्नावर भाजपचं प्रत्युत्तर, ‘सत्तेत यायचंय पण घेत नाहीत म्हणून…’

‘फडणवीस गप्प का?’ ‘सामना’तून केलेल्या प्रश्नावर भाजपचं प्रत्युत्तर, ‘सत्तेत यायचंय पण घेत नाहीत म्हणून…’

| Updated on: Apr 14, 2025 | 5:38 PM

फुले चित्रपटाच्या वादासंदर्भात फडणवीस का बोलत नाहीत? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. यावरून चंद्रकांत पाटील यांनी पलटवार करत राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊतांच्या मनातला जातीवाद प्रत्यक्षात येऊ शकत नाही. ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचे पण घेत नाहीत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. सत्तेत घेत नसल्यामुळे संजय राऊत टीका करतायत असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हणत त्यांच्यावर खोचक टीका केली आहे.

संजय राऊतांनी सामनात लिहिलेल्या आग्रलेखामुळे आता वाद सुरू झाला आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्र प्रतिगामी शक्तींच्या विळख्यात सापडला. फुले चित्रपटाला त्यातूनच विरोध सुरू आहे. महाराष्ट्रात फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असा हा झगडा आहे. मुख्यमंत्री फडणवीस या सामाजिक विषयावर गप्प का बसले आहेत? त्यांनी मौन सोडावं नाहीतर हा झगडा फुले विरुद्ध फडणवीस असाच आहे, यावर शिक्का बसेल. असा आग्रलेख सामनात लिहिण्यात आला आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. संजय राऊतांच्या मनातला जातीवाद हा अस्तित्वात येऊ शकणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचं आहे पण त्यांना घेतलं जात नाही असाही दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे सत्तेत घेतलं जात नसल्याच्या वैफल्यातून संजय राऊत रोज टीका करत असतात असंही चंद्रकांत पाटील म्हणाले तर सामनाच्या सल्ल्यानुसार देवेंद्र फडणवीस काम करत नाहीत तसं उत्तर मुनगंटीवार यांनीही दिले आहे.

Published on: Apr 14, 2025 05:38 PM