महाविकास आघाडीची ‘ती’ अट… आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान

| Updated on: Feb 06, 2023 | 1:52 PM

'पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार पण...'

Follow us on

पुणे : पार्लमेंटरी बोर्डाने भाजप उमेदवार हेमंत रासने यांना कसबा पोटनिवडणुकीत मान्यता दिली आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हेमंत रासने यांचा अर्ज दाखल केला आहे. मतदारांवर असलेल्या विश्वासातून आम्ही निवडणूक विजयी होऊ, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. गेल्या ८ दिवसांपासून ही निवडणूक बिनविरोध करावी, यासाठी विनंती करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाविकास आघाडीला याबाबत सांगितले आहे. निवडणूक बिनविरोध करावी ही विनंती आमची शेवटपर्यंत असणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही हा निर्णय घेता येऊ शकतो. जर महाविकास आघाडीची काही अट असेल तर त्यांचे म्हणणं ऐकण्यास आम्ही तयार आहोत, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.