‘संजय शिरसाटांचा संजय राजाराम राऊत होऊ नये बस…’, भाजपच्या बड्या नेत्याचा खोचक सल्ला

‘संजय शिरसाटांचा संजय राजाराम राऊत होऊ नये बस…’, भाजपच्या बड्या नेत्याचा खोचक सल्ला

| Updated on: Feb 02, 2025 | 2:52 PM

वेळ आली तर ठाकरे-शिंदेनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हे विधानं आहेत शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांची आहेत. आपल्या विधानांनी खळबळ माजवल्यानंतर मात्र संजय शिरसाट यांनी आपली भूमिका बदलली.

‘मला संधी मिळाली, तर मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेन.’, असं वक्तव्य शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केलं. यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, संजय शिरसाट यांनी केलेलं वक्तव्य आणि एकनाथ शिंदे यांची अस्वस्थतेबाबत केलेल्या सामनातून दाव्यासंदर्भात भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांना सवाल करण्यात आला. त्यावर नितेश राणे म्हणाले, “तसे प्रयत्न त्यांनी करत रहावेत. पण त्याबद्दल एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांच काय मत आहे, याबद्दल त्यांनी विचार करावा. संजय शिरसाट आमचे मित्र आहेत. फक्त त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये एवढीच अपेक्षा आहे” असं नितेश राणेंनी त्यांना टोला लगावला आहे. नितेश राणे हे चंद्रपूरमध्ये धर्म सभेसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यासोबतच एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत का? यावर बोलताना नितेश राणे म्हणाले, “कोणी अस्वस्थ नाही. सगळे खुश आहेत. शिंदेसाहेब, अजितदादा, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आपआपल्या खात्याच काम संभाळतोय. आम्हाला महाराष्ट्र पुढे घेऊन जायचं आहे. विरोधकांकडे काही काम राहिलेलं नाही. ते बरोजगार झाले आहेत”, असं राणे म्हणाले.

Published on: Feb 02, 2025 02:52 PM