Pravin Chavan यांचा घातपात होण्याची शक्यता, त्यांना केंद्रीय पोलीस संरक्षण द्या - Chandrakant Patil

Pravin Chavan यांचा घातपात होण्याची शक्यता, त्यांना केंद्रीय पोलीस संरक्षण द्या – Chandrakant Patil

| Edited By: | Updated on: Mar 13, 2022 | 9:02 PM

फडणवीसांनी टाकलेल्या व्हिडीओ बॉम्बवरुन आरोपांच्या केंद्रस्थानी आलेले विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) यांच्या जीवाला धोका असल्याची भीती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलीय.

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत एक व्हिडीओ बॉम्ब (Video Bomb) टाकून एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच पोलीस बदली घोटाळा प्रकरणात आज देवेंद्र फडणवीस यांचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवला आहे. अशावेळी फडणवीसांनी टाकलेल्या व्हिडीओ बॉम्बवरुन आरोपांच्या केंद्रस्थानी आलेले विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) यांच्या जीवाला धोका असल्याची भीती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलीय. तर मागील तीन महिन्यांपासून रेकॉर्डिंग विरोधी पक्षाकडे होते. मग ते गप्प का बसले? असा सवाल प्रविण चव्हाण यांनी केलाय.