मारामारी करुन Kirit Somaiya यांना गप्प बसवतात का? आम्हीही सोडणार नाहीत- Chandrakant Patil

मारामारी करुन Kirit Somaiya यांना गप्प बसवतात का? आम्हीही सोडणार नाहीत- Chandrakant Patil

| Edited By: | Updated on: Feb 05, 2022 | 9:51 PM

खुद्द भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसैनिकांनी आपल्यावर हल्ला केला असल्याचा आरोप ट्वीट करत केलाय. तर दुसरीकडे सोमय्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेल्या शिवसैनिकांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सडकून टीका केली आहे.

पुणे : पुण्यात हायवोल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय. किरीट सोमय्या (Kirit Somaiya Latest Updates) यांची गाडी शिवसैनिकांनी पुण्यात अडवली. यावेळी सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोमय्यांना धक्काबुक्कीदेखील झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. खुद्द भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसैनिकांनी आपल्यावर हल्ला केला असल्याचा आरोप ट्वीट करत केलाय. तर दुसरीकडे सोमय्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेल्या शिवसैनिकांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांच्याविरोधात निशाणा साधताना चंद्रकात पाटील यांनी मारामाऱ्या कशाला करता, असा खरपूस सवाल उपस्थित केलाय. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना चॅलेंज केलं होतं. जर तुमच्याकडे पुरावे असतील, तर सिद्ध करा, असं राऊत म्हणाले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी उपरोधिक टोला लगावत म्हटलंय की, ‘हो ना, मग मारामाऱ्या कशाला करता!’