Chitra Wagh : ‘ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो’.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या

Chitra Wagh : ‘ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो’.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या

| Updated on: Mar 21, 2025 | 7:01 PM

Chitra Wagh News Updates : अनिल परब यांच्यावर काल केलेल्या वक्तव्यानंतर आज भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी बोलताना विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे.

ज्याची जेवढी लायकी आहे तेवढाच तो विचार करतो आणि तेवढंच बोलतो. काल माझं नाव घेऊन अनिल परब बोलले त्यामुळे मी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं, असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हंटलं आहे. काल सभागृहात अनिल परब यांना केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत होती. त्यावर आज वाघ यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या चारित्र्यावर कायम बोललं जातं. कायम प्रश्न उपस्थित केले जातात. अजून किती दिवस तेच तेच प्रश्न विचारणार आहे? असा उलट प्रश्न देखील यावेळी त्यांनी केला.

पुढे बोलताना चित्रा वाघ सुषमा अंधारे यांच्याविषयी बोलताना म्हणाल्या की, या प्रकरणात त्यांनी बोलण्याचा संबंध नव्हता. तुम्ही स्वत:ला काय समजता? तुम्ही कोण? तुमची लायकी काय? तुमचा नेता माझ्याकडे बोट दाखवून माझं नाव घेऊन बोलला, मग मी उत्तर देऊ नको? पण यांना कोणत्याही परिस्थितीतून फक्त घाण काहीतरी काढायचं असतं, अशी टीका वाघ यांनी यावेळी केली.

Published on: Mar 21, 2025 07:01 PM