Special Report | उद्धव ठाकरे, संजय राऊत ते नवाब मलिक, फडणवीसांचा हल्लाबोल

| Updated on: Nov 16, 2021 | 9:28 PM

सरकारचं अस्तित्वच दिसत नाहीये. एक मुख्यमंत्री आहेत. त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीये. प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री मानतो. पण आपल्या स्वतच्या पलिकडे पाहायला तयार नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.

Follow us on

YouTube video player

मुंबई: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मी अजूनही मुख्यमंत्री आहे असं मला वाटतं, असं विधान केलं होतं. आता त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना राज्यातील जनता मुख्यमंत्री मानायला तयार नाही, असं विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकारिणीला संबोधित करताना हे विधान केलं. सध्या महाराष्ट्रावर विश्वासहार्यतेचं संकट उभं राहिलं आहे. देशातील सर्वाधिक प्रगतीशील, सर्वाधिक समृद्ध आणि सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेलं राज्य आहे. पण या राज्यात सरकार कुठे आहे? हे विचारण्याची वेळ आली आहे. सरकारचं अस्तित्वच दिसत नाहीये. एक मुख्यमंत्री आहेत. त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीये. प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री मानतो. पण आपल्या स्वतच्या पलिकडे पाहायला तयार नाही, अशी टीका फडणवीसांनी केली. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रकृती बरी होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.