संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर – गिरीश महाजनांनी घेतला समाचार

संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर – गिरीश महाजनांनी घेतला समाचार

| Updated on: Feb 08, 2025 | 1:51 PM

संजय राऊतांबद्दल जास्त न बोललेलं बरं. त्या माणसाला काही काम नाही, सकाळ झाली की काहीतरी वाह्यात बोलायचं, फालतू बडबड करायची. त्यांनाकोणीही गांभीर्याने घेत नाही, ना कोणी त्यांचं ऐकतं. त्यांच्यामुळे सिवसेना ठाकरे गटाची दयनीय अवस्था झाली आहे

संजय राऊतांबद्दल जास्त न बोललेलं बरं. त्या माणसाला काही काम नाही, सकाळ झाली की काहीतरी वाह्यात बोलायचं, फालतू बडबड करायची. त्यांनाकोणीही गांभीर्याने घेत नाही, ना कोणी त्यांचं ऐकतं. त्यांच्यामुळे सिवसेना ठाकरे गटाची दयनीय अवस्था झाली आहे. उबाठाचे खासदार आहे तेही त्यांच्याकडे रहायला तयार नाहीत,अशा शब्दांत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं.

या माणसामुळे ( संजय राऊत) आपली पूर्णपणे वाट लागलेली आहे, येत्या महापालिका निवडणुकीतसुद्धा आपल्याला कुठेही स्थान राहणार नाही. एकटया माणसाला कंटाळून संपूर्ण उबाठा आता इकडे तिकडे फिरत्ये, सैरभैर झाली आहे, अशी टीकाही गिरीश महाजन यांनी केली.

काँग्रेसची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे, दिल्लीत 70 पैकी एकही जागा त्यांना मिळालेली नाही. मोजकी 2-3 राज्यं सोडली तर सगळ्याचं ठिकाणी, प्रत्येक राज्यामध्ये हेच चित्र दिसतंय. देशामध्ये काँग्रेस कुठेही राहिलेली नाही, आता ती अस्ताकडे चालली आहे, काँग्रेसचा शेवट होतोय, अस वाटतंय. त्यांचं नेतृत्व ते बदलायला तयार नाहीत, एखाद्या भरकटलेल्या जहाजासारखी काँग्रेस पक्षाची अवस्था झाल्याची टीकाही गिरीश महाजन यांनी केली.

राऊतांनी केली होती टीका

देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्राचा अभ्यास कमी आहे. त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करायचं आहे. पण जोपर्यंत अमित शाह आहेत, तोपर्यंत त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करायला संधी मिळेल का याबाबत शंका आहे. फडणवीस दिल्लीत प्रचाराला गेले नसते तरी हाच निकाल आला असता. कारण निकाल आधीच ठरलेला होता, असा दावा संजय राऊत यांनी आज केला होता.

Published on: Feb 08, 2025 01:46 PM