मनपा निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का, डोंबिवलीचा गड जाणार?

मनपा निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का, डोंबिवलीचा गड जाणार?

| Updated on: Jun 27, 2025 | 9:05 AM

Maharashtra Politics : मनपा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे.

मनपा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या डोंबिवलीतून माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी ठाकरे गटात लवकरच प्रवेश करण्याचे संकेत देखील दिले आहेत.

डोंबिवलीतील भाजप नेते आणि नगरसेवकांच्या गटाला मोठा धक्का देणारी घटना घडली आहे. माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे त्यांनी स्थानिक नेतृत्वाकडून सहकार्याचा अभाव आणि विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याचा आरोप केला आहे.

Published on: Jun 27, 2025 09:05 AM