भंडाऱ्याचे शिवसेना समर्थित अपक्ष आमदार नरेंद्र बोंडेकर यांच्याशी भाजप नेत्यांनी संपर्क साधला
विधानपरिषद निवडणूकीत पाचवा उमेदवार निवडूण येईल
Image Credit source: tv9 marathi

भंडाऱ्याचे शिवसेना समर्थित अपक्ष आमदार नरेंद्र बोंडेकर यांच्याशी भाजप नेत्यांनी संपर्क साधला

| Updated on: Jun 17, 2022 | 11:06 AM

विधानपरिषद निवडणूकीत पाचवा उमेदवार निवडूण येईल, इतकी मतं भाजपकडे नाहीत. त्यामुळे आता भाजपने आमदार जोडो अभियान सुरु केलं आहे. विदर्भातील अपक्ष आमदार गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

विधानपरिषद निवडणूकीत पाचवा उमेदवार निवडूण येईल, इतकी मतं भाजपकडे नाहीत. त्यामुळे आता भाजपने आमदार जोडो अभियान सुरु केलं आहे. विदर्भातील अपक्ष आमदार गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भंडाऱ्याचे शिवसेना समर्थित अपक्ष आमदार नरेंद्र बोंडेकर यांच्याशी भाजप नेत्यांनी संपर्क साधला आहे. भाजपला मतदान करण्याची विनंती केली असा गौप्यस्फोट अपक्ष आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी केला आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं शिवसेनेला मतदान करणार, असं बोंडेकर यांनी सांगीतलं आहे.
विदर्भात देवेंद्र भुयार, आशीष जयस्वाल, विनोद अग्रवाल, नरेंद्र भोंडेकर, रवी राणा, किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार आहेत. आगामी विधानपरिषद निवडणूकीत या अपक्ष आमदारांची भुमिका महत्त्वाची असणार आहे. त्यातंच आता भाजप नेत्यांनी संपर्क साधल्याचा गौप्यस्फोट करुन नरेंद्र बोंडेकर यांनी खळबळ उडवून दिली आहे.

Published on: Jun 17, 2022 11:06 AM